स्टेट बँकेला येस बँकेतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची इच्छा : निर्मला सीतारामण

नवी दिल्ली (प्रतिनिधी) देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँकेने येस बँकेतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ३० दिवसांच्या आत येस बँकेचे रि-स्ट्रक्टर केले जाईल. ही योजना रिझर्व्ह बँकेने आणली असल्याची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

येस बँकेवर प्रतिबंध लावल्यानंतर आणि पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर येस बँकेच्या पुनर्रचनेबाबत विस्तृत माहिती दिली आहे. यावेळी 2017 पासून रिझर्व्ह बँक सातत्याने येस बँकेचे निरीक्षण आणि चौकशी करीत आहे. येस बँकेचा कारभार खूपच कमकुवत होता. क्रेडिट निर्णयांसोबत, मालमत्तेचे चुकीचे वर्गीकरण सुद्धा करण्यात आले होते, असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी येस बँकेचा चेहरा 30 दिवसांत बदलेल, असे सांगितले.

Protected Content