कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची बाधा

बंगळुरू वृत्तसंस्था । देशभरातील उच्चपदस्थ राजकारण्यांना कोरोनाची बाधा होत असतांना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यानंतर आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती दिली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो, असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

येडियुरप्पा हे करोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोनाने ग्रासले आहे.

Protected Content