नीरव मोदींना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश

nirav modi 1

पुणे प्रतिनिधी । हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज (दि.6 जुलै) रोजी येथील कर्ज वसुली न्या. पीठासीन अधिकारी दिपक ठक्कर यांनी दिले आहेत.

मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. मोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. तर मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 6 जुलै रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट होते. बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा 7 हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा 300 कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा एक हजार 700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.

Protected Content