महसूल थकविल्याने मोबाईल टॉवर्स सील करण्याचे तहसिलदारांचे आदेश

रावेर प्रतिनिधी । महसूल कर थकविल्या प्रकरणी रिलायन्सच्या दहा टॉवर्सला सील करण्याचे आदेश तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी काढल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की मार्च महिना सुरू झाल्यानंतर सर्वच स्तरांमधून महसूल कर वसूलीचे काम सुरु आहे. कर वसूली संदर्भात येथील तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी प्रयत्न सुरू केले असून रिलायन्सने त्यांच्या १० टॉवरचे ५ लाख ४० हजार थकविल्याने त्यांनी टॉवर सील करण्याचे निर्देश दिले आहेत. आता पर्यंत तालुका भरात असणार्‍या इंडस कंपनी ३३ टॉवरचे १८ लाख ८ हजार वसूल झाले असून ५० हजार बाकी आहे.तर जिओ कंपनी २७ टॉवरचे १२ लाख ५० हजार वसूल केले आहे. तर जिटीएलच्या ९ टॉवरचे ५ लाख ४७ हजार वसूल करण्यात आली आहे. आता पर्यंत ७९ टॉवर कडून ३६ लाख ५ हजार वसूल करण्यात आले आहे.

Protected Content