सोनी नगरात महाशिवरात्रीनिमित्ताने उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने उद्या मंगळवार दि. १ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाशिवरात्रीनिमित्ताने सोनी नगरातील महादेव मंदिरात सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते रुद्रअभिषेक व हवन पूजा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महादेवाची आरती परिसरातील भाविकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता शहरातील श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी समुहसह भजन सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महादेवाची महाआरती होणार आहे. कीर्तनकार ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोनी नगर परिसरातील शिवभक्तांनी उपस्थिती रहावे असे आवाहन शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

Protected Content