फैजपूर येथे महिला तलाठ्याचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या चिनावल येथे तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून सासरी खिरोदा येथे मुक्कामाला पतीसह थांबले होते. मध्यरात्री बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि २० हजाराची रोकड असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. तळेले कुटुंबिय रविवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे उघड झाले. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. याप्रकरणी चेतन तळेले यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार उमेश चौधरी, रवींद्र मोरे, ज्ञानेश्वर पवार हे करीत आहेत.

Protected Content