भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वेचा भुसावळ विभागातील कार्मिक विभागातर्फे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी व्हर्च्युअल पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित केलेल्या पेन्शन अदालतीत आलेले सर्व ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच त्यावर चर्चा करून त्यांना ४ लाख २७ हजार ९३५ रूपयांची देय रक्कम एनईएफटी द्वारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात तत्काळ वर्ग करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी व्हर्च्युअल पेन्शन अदालतीला संबोधित केले. कोव्हीड १९ कोरोनाच्या पाश्वभुमीवर आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे सेवानिवृत कर्मचारी व त्यांच्या संघटनेने यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल कौतुक केले.