सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत होता : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा होता. तसेच मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. याआधीही स्वामी यांनी सुशांतचा खून झाल्याचे म्हटले होते.

 

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. आर. सी. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत (जसे की तुटल्यासारखा) होता’ असे सुब्रमण्यम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. तसेच कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, याआधीही स्वामी यांनी सुशांतचा खून झाल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी खुन असल्याची २६ कारणं दिली होती.

Protected Content