दुकानदाराची ४२ हजार रूपयांत फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकानातील कामगाराने ऑर्डरचे दिलेले पैसे दुकान मालकाला न देता परस्पर ठेऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामगार तरूणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, एका जणाने रामनगरातील सागर किराणा येथे दुधाची ८० कॅरेटची ऑर्डर दिली होती. त्यानुसार ज्ञानेश्वर पाटील यांनी दुकानातील कामगार ईश्वर राजेंद्र सोनार यास ऑर्डर संबंधितांकडे देण्याचे सांगितले. संबंधितांनी ऑर्डरनुसार पिलाचे ४२ हजार रुपये कामगार ईश्वर यांच्याकडे दिले. मात्र कामगार ईश्वराने पैसे दुकान मालकाला न देता परस्पर ठेवून घेतले. १५ मे रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर ही ऐश्वर्याने संबंधित रक्कम दुकान मालकाला दिले नाही. अखेर कामगार ईश्वर याने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर दुकान मालक ज्ञानेश्वर पाटील यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून कामगार ईश्वर राजेंद्र सोनार रा. रामनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.04:16 PM

Protected Content