धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१६ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. मयत झालेल्या तरूणाची ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत चेंदामेंदा झाल्यामुळे तसेच, कपड्यांमध्ये कुठलेही कागदपत्र आढळून आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोकॉ प्रवीण लोहार हे तपास करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.

Protected Content