जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पांजरपोळ चौक येथील रहिवाशी स्व. सुरेश जगन्नाथ सुरळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी म्हणून सुरळकर परिवाराच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले.
शहरातील जी.एस. मैदान येथे नुकतीच तेली प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सुरळकर परिवाराच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले. यावेळी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरसेवक मनोज चौधरी, किशोर चौधरी, डी ओ चौधरी, प्रदीप चौधरी, मनिलाल चौधरी, संतोष चौधरी, अशोक चौधरी, विजय चौधरी, पांडुरंग महाले, निर्मला चौधरी, बेबाबाई सुरलकर, शैलेश सुरळकर, ज्योती सुरळकर, रोहिणी सुरळकर, नगरसेविका चेतना चौधरी, अशोक चौधरी, गणेश सोनवणे, दिलीप चौधरी, पितांबर चौधरी, योगराज चौधरी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. दिलीप चौधरी, सुरेश पाटील, सुभाष चौधरी, उमेश चौधरी, स्वप्नील चौधरी, विनोद चौधरी, नंदू चौधरी, चेतन चौधरी, बंटी चौधरी, जितेंद्र चौधरी, राहुल चौधरी, मोहित चौधरी, सागर चौधरी, विशाल पाटील व सामाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक तेली महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी केले होते.