विद्यापीठात परीसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारे आयोजित परीसर मुलाखतीमध्ये सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

 

विद्यापीठीय केमिकल टेक्नालॉजी संस्था व एसएसबीटी आभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथील विद्यार्थ्यांसाठी सुप्रिम पेट्रोकेम लि. आमदोशी, रायगड ह्या कंपनीतर्फे आयोजित मुलाखतीमध्ये विद्यापीठीय केमिकल टेक्नालॉजी संस्थेच्या प्रज्वल पिसुदे, शाश्वत सहस्त्रबुध्दे, अभिषेक आंबेकर, आनंद पाटील, आदेश पवार, मयुर राजपूत तर एसएसबीटी आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमोलकुमार ठाकूर या सात विद्यार्थ्यांची वार्षिक चार लाख वेतनावर निवड करण्यात आली. या मुलाखती घेण्यासाठी कंपनीचे जीएम प्रोडक्शन ए. एम. परांजपे, ए. के. मेटांगळे उपव्यवस्थापक एच.आर, ओ. व्ही. खानापुरे उपव्यवस्थापक टेक्नीकल, ए. डी. पेडणेकर सहायक एच.आर हे उपस्थित होते. या परीसर मुलाखतीमध्ये २५ विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा व तदनंतर मुलाखती घेण्यात आल्या.  कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळा संचालक प्रा. जे.बी. नाईक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या मुलाखतीचे व्यवस्थापन समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी केले.

Protected Content