Home Cities चोपडा नूतन विद्यालयात कृषी आयुक्त सहसंचालकांच्या हस्ते वृक्षारोपण

नूतन विद्यालयात कृषी आयुक्त सहसंचालकांच्या हस्ते वृक्षारोपण

0
220

nutan vruksharopan

चोपडा प्रतिनिधी ।  तालुक्यातील चुंचाळे येथे नूतन माध्यमिक विद्यालय,उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

चुंचाळे येथील श्री समर्थ सेंद्रिय गटाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास कृषी विभागाचे पदाधिकारी व गटाचे सदस्य उपस्थित होते. यात पुणे सहसंचालक कृषी आयुक्त कार्यालय येथील श्री. कुलथे साहेब, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक कार्यालय जळगाव येथील अनिल भोकरे, अमळनेर येथील उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, चोपडा तालुका कृषी अधिकारी पांडुरंग चौधरी, चोपडा आत्मा समन्वयक महेंद्र साळुंखे, कृषी पर्यवेक्षक सुनील गुजराथी ,दिनेश पाटील व महेश सनेर, कृषी सहाय्यक दिपक पाटील, मंडळ अधिकारी आर.एम. पाटील, गटाचे अध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष अमरनाथ चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound