जळगाव प्रतिनिधी । सुरभि महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त नवसाच्या गणपती मंदिर हॉल येथे निस्पृह कार्य करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील आठ संस्थाचा सन्मान करण्यात आला.
यात सुधर्मातर्फे सुनीता बेलसरे, उडान -हर्षाली चौधरी, कॉमन ऑफ हेल्थ -सुधा काबरा, निधी फौंडेशन – वैशाली विसपुते, पर्यावरण शाळा -चेतना नन्नावरे, सेवालय- मंगलाताई पाटील, आरंभ – सुंदर कोळी, राष्ट्र सेविका समिती – संगीता अट्रावलकर. या संस्था तथा त्यांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या डॉ. आरती हुजुरबाजार या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्र सेविका समितीकडून घेण्यात आलेल्या राष्ट्र गीत गायन स्पर्धेतील तृतीय क्रमांक विजेता गीताने झाली.
प्रास्ताविक -स्वाती कुळकर्णी. दीप्रज्वलन -प्रमुख पाहुण्या डॉ. आरती हुजुरबाजार, अध्यक्ष स्वाती कुळकर्णी, मंजुषा राव, विनया भावे, रेवती शेंदुर्णीकर. सहकार्य -वैशाली कुलकर्णी, सुनीता सातपुते, मेघा नाईक, वैदेही नाखरे, ज्योती भोकरडोळे, नीलिमा नाईक, शुभांगी पुरणकर, संजीवनी नांदेडकर साधना दामले. सर्व सन्मानार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्यावेळी करोना व्हायरस होऊ नये, म्हणून कशी काळजी घ्यावी हे सांगण्यात आले.