Home क्राईम पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर चालत्या आयशर टेम्पोत बलात्कार !

पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर चालत्या आयशर टेम्पोत बलात्कार !

0
36


पुणे (वृत्तसंस्था) चालत्या आयशर टेम्पोमध्ये एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिडीत महिलेने आळंदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला रात्री अकरा ते ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. आळंदीतल्या एका महिलेला टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असे सांगून गाडीत बसवून घेतले. त्यानंतर त्याने टेम्पो पेरणेफाटा येथे घेऊन न जाता पिंपरी चिंचवडच्या दिशेने नेला. त्यानंतर टेम्पोमध्येच तिच्यावर चालक व क्लिनर यांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडला सोडून ते पसार झाले. या घटनेनंतर ही महिला परत आळंदी येथे आली. तिने पोलिसांकडे धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चालक, क्लिनर फरार झाले आहेत.


Protected Content

Play sound