जि.प.शाळा चिखलोद येथे वॉटर बेल उपक्रमास प्रारंभ

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील चिखलोद येथील जि. प. प्राथमिक शाळेत नुकतेच स्नेह संमेलन पार पडले. यात विद्यार्थ्यांना वॉटर बेल उपक्रमाअंतर्गत थर्मास वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापिका योगिता सुर्यवंशी या शाळेवर हजर झाल्यापासुन त्यांनी विदयार्थांच्या विविध गुणदर्शनाचा म्हणजे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू केला. त्याचे ग्रामस्थ यांना अप्रुप वाटुन विदयार्थ्यांना भरघोष बक्षिसे दिले. बक्षिस हे नेहमी सहभागी विदयार्थ्यानाच मिळतात इतर विद्यार्थी त्यापासुन वंचित असतात. त्यांनाही प्रोत्साहन मिळावे व एक सर्वच विदयार्थ्याना उपयुक्त ठरेल अशी गोष्ट करण्याचे मुख्याध्यापिका योगिता सुर्यवंशी व उप शिक्षक राहुल पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करून शाळेत वॉटर बेल उपक्रम सुरू करण्याचे ठरवुन रोख बक्षिस मिळालेल्या लोकसहभागातुन सर्व विदयार्थ्यांना चांगल्या प्रतीच्या प्रमाणित थर्मास युक्त पाणी बाटल्या वाटप केल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व बहुतेक ग्रामस्थ उपस्थित होते. वॉटर बेल हा उपक्रम केरळ राज्याच्या धर्तीवर असुन ठराविक तासा नंतर घंटा वाजवुन विदयार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण केली जाते. विदयार्थी तहान लागली तर पाणी पिण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे विविध आजारांना बळी पडतात. त्यांना त्यासाठी सुंदर बाटल्या उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना नियमित व वेळेवर पाणी पिण्याची सवय लागेल. कार्यक्रमाच्या उद्देश व सुत्रसंचलन मुख्याध्यापिका योगिता सुर्यवंशी तर आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले .केंद्र प्रमुख शेळावे जितेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Protected Content