Home धर्म-समाज पारोळा येथे बालाजी मंदिरात साकारतेय म्युझियम

पारोळा येथे बालाजी मंदिरात साकारतेय म्युझियम

0
168


parola temple

पारोळा, प्रतिनिधी | येथील आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराज संस्थानकडून पर्यटनाच्या पाच कोटींच्या विकास निधीच्या माध्यमातून भव्य असे म्युझियम, प्रसादालय, अभिषेक कक्ष अशी तीन मजली वास्तू उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य विश्वस्त तथा अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली.

संस्थानच्या वतीने गुरुवारी ब्रह्मोत्सवानिमित्त ही पत्रकार परिषद घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त केशव क्षत्रिय, नवनीत गुजराती, संजय कासार, अरुण नारायण वाणी, चंद्रकांत शिंपी आदी यावेळी उपस्थित होते.

संस्थानचे पारंपारिक १६५ बाहुले हे म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असून ते भाविकांना वर्षभर पाहता येणार आहेत. ब्रह्मोत्सवात दररोज निघणारे वहन त्या वहनांच्या क्रमांनुसार म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत. भाविकांसाठी प्रसादालयाचेही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे. संस्थेचे विश्वस्त माजी खासदार ए.टी.पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून पाच कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ५० लाख रुपये निधीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन सध्या या वास्तूचे काम प्रगतिपथावर आहे. बालाजी पार्क येथे नगराध्यक्ष करण पवार यांनी संस्थानला दिलेल्या या जागेवर कल्याण कट्टा, भक्तनिवास, देवी पद्मावतीचे मंदिर उभारण्याचा संस्थानचा मानस आहे, अशी माहितीही यावेळी विश्वस्तांनी दिली. येत्या २९ सप्टेंबरपासून शहरात ब्रह्मोत्सवाला सुरुवात होत आहे.


Protected Content

Play sound