औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांच्याबाबत गलीच्छ टिपण्णी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलया विधानांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. यातच आज शिंदे गटाचेच एक दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडली आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना खासदार सुप्रीया सुळे यांच्याबाबत एक अतिशय आक्षेपार्ह टिपण्णी केली. संबंधीत पत्रकाराने सुप्रीयाताई या शिंदे गटावर पन्नास खोके घेतल्याचे आरोप करत आहेत. तुम्हाला देखील खोके मिळाले आहेत का ? असा प्रश्न विचारला. यावर अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रीया सुळे यांच्यावर टिका केली. यामुळे आता राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून याचे व्यापक पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे.