सुप्रीम कोर्टानं शेतकरी आंदोलनासरखी जम्मू काश्मीरच्या प्रश्नाची दखल घ्यावी — ओमर अब्दुल्ला

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । उमर अब्दुल्ला यांनी शेतकरी आंदोलनाप्रमाणं सुप्रीम कोर्टानं कलम ३७० हटवल्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

नॅशनल कॉन्फरन्स उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी सुप्रीम कोर्टानं शेतकरी आंदोलनाप्रमाणं कलम ३७० आणि ३५ अे हटवल्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करावी अशी मागणी केली आहे.

शेतकरी आंदोलनांची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली. सुप्रीम कोर्टानं कृषी कायदे बनवताना कुणाचा सल्ला घेतला गेला नसल्याचं स्पष्ट केले होते. या प्रकारे ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरबाबात जे निर्णय घेण्यात आले होते. त्यावेळी जम्मू काश्मीरच्या लोकांना विचारात घेण्यात आलं नव्हतं. यामुळे सुप्रीम कोर्टानं या मुद्यावर तातडीनं सुनावणी सुरु करावी आणि निर्णयात आम्हाला सहभागी करुन घ्यावं, असं म्हटलं आहे.

उमर अब्दुल्ला यांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास असल्याचं स्पष्ट केले. अब्दुल्ला यांनी सुप्रीम कोर्टानं त्यांच्या निरीक्षणात बोलताना कायद्याची गोष्ट असेल तर सर्वकाही बदललं जाऊ शकत, असल्याचे सांगितले. मात्र, निश्चित वले निघून गेल्यानंतर त्यामध्ये जास्त बदल करणं शक्य नाही, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.

आज आमच्याकडे कोणते मूलभूत अधिकार राहिले आहेत? कोणतेच नाही. आमच्याजवळ बोलण्याचाही अधिकार नाही. आमच्या प्रश्नी आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार राहिलेला नाही. मात्र, भाजपसाठी ही सामान्य गोष्ट आहे. जम्मू काश्मीरला उद्धवस्त करण्यात आलं आहे. इतरांसाठी ही सामान्य परिस्थिती वाटत आहे. मात्र, आम्ही या परिस्थिती राहण्यास तयार नसल्याचं, उमर अब्दुल्ला म्हणाले.

Protected Content