औरंगाबाद महापालिकेची आ. गिरीश महाजनांवर जबाबदारी

मुंबई प्रतिनिधी । आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर भाजपने पाच नेत्यांवर प्रमुख जबाबदारी दिली असून यात औरंगाबादची जबाबदारी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

येत्या काही दिवसात राज्यातील ५ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजप आपल्या मातब्बर नेत्यांकडे जबाबदारी सोपविली आहे.

याच्या अंतर्गत औरंगाबाद मनपासाठी गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. येथे निवडणूक प्रमुख म्हणूत अतुल सावे तर निवडणूक संघटनात्मक जबाबदारी ही संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.

अलीकडच्या काळात आ. गिरीश महाजन यांच्या विरूध्द विरोधकांनी मोर्चा उघडला असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तथापि, पक्षाने त्यांच्यावर औरंगाबादची जबाबदारी सोपवत त्यांच्यावर विश्‍वास दर्शविला आहे.

Protected Content