सीबीएसई एरोबिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकलव्यच्या खेळाडूंची निवड

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या ९ खेळाडूंची २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या सीबीएसई एरोबिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी क्लस्टर ९ या परिक्षेत्रातून निवड झालेली आहे.

या स्पर्धा ४ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे होत असून स्पर्धेत ११, १४ आणि १९ वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मान्यतेने होणार आहेत.

एकलव्यच्या संघातील खेळाडू या स्पर्धेमध्ये 11 वर्षाखालील व 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सहभागी होणार आहेत. या संघातील अनुष्का चौधरी व साची इंगळे या दोन खेळाडूंची सलग तिसऱ्या वर्षी सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयाचे खो-खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच पालकांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

निवड झालेले खेळाडू:-

माही फिरके (महिला एकेरी) , साची इंगळे (महिला एकेरी), अनुष्का चौधरी (महिला एकेरी), कैवल्य जोशी (पुरुष एकेरी) साची इंगळे, गायत्री देशपांडे, कृष्णाई रेंभोटकर, आयूषी मिश्रा, श्लोक बेलसरे व आशुतोष मिश्रा (मिश्र समूह) यांचा समावेश आहे.

Protected Content