सीबीआय संचालक अश्विनीकुमारांच्या मृत्यूचे रहस्य शोधा

 

मुंबईः वृत्तसंस्था । ‘सुशांतच्या आत्महत्येनंतर जे प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सीबीआयचे नेृतृत्व केलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येनं सीबीआयने तरी पापण्यांची उघडझाप करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

काही महिन्यांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. महाराष्ट्र सरकारलाही लक्ष्य करण्यात आलं होतं. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला . एम्स अहवालानुसार सुशांतनं आत्महत्याचं केल्याचं स्पष्ट होतं आहे.

‘सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्यानं ग्रासते, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही,’ अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.

‘ अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचल मध्ये वास्तव्यास असलेल्या नटीनं भाष्य केलं पाहिजे. अश्विनीकुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असं वाटू नये, हे गौडबंगाल आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे.

सुशांतसिंह रातपूतनं आत्महत्या केली असं वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला लोक तयार नाहीत. हाथरसची तरूणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आपल्या देशात काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही.

सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. सुशांत पडद्यावरचा हीरो होता. अश्विनीकुमार हे पोलीस प्रशासनाचे ‘नायक’ होते. हिमाचलच्या एका नटीने सुशांत आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सी.बी.आय.च्या माजी संचालकांनी आत्महत्या केली यावर कुणी उसासाही सोडू नये? अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये असे शिवसेनेचे म्हणणे आहे . .

Protected Content