सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा – राऊत

sanjay raut 3

नवी दिल्ली वृत्तसंस्था । स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘जे लोक वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करत असतील, त्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगात पाठवा. तेव्हा त्यांना सावरकर काय आहेत हे माहिती पडेल.’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असे म्हटले होते की, ‘माझे नाव राहुल सावरकर नाही आहे’. त्यावेळी संजय राऊत यांनी असे म्हटले होते की, हिंदुत्ववादी विचारवंताच्या श्रध्देवरुन कोणतीही तडजोड करता येणार नाही. राऊत यांनी पुढे असे सांगितले होते की, ‘आम्ही महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचा आदर करतो. कृपया वीर सावरकरांचा अपमान करू नका. जो समजुतदार आहे त्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.’, असे त्यांनी म्हटले होते.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही पक्षविरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Protected Content