सावद्यातील रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

सावदा प्रतिनिधी । शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर साईबाबा मंदिर, डॉ.अविनाश बऱ्‍हाटे याच्या दवाखान्याजवळ तसेच रावेर रोडवरील एलआयसी बिल्डींग समोर बऱ्‍हाणपूर ते अकलेश्वर या हायवे रोडवर काही महिन्यापासून ठिकठिकाणी मोठ खड्डे पडलेले आहेत. कित्येक महिन्यापासून स्थानिक लोक या महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शिवसेनेने रास्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे .

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, रात्री बाईक वरून जाणारे येणारे आपला जीव वाचवत खड्डयातून मार्ग काढत असतात. या महामार्गावर हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम कार्यालय सुप्दा आहे पण याकडे जाणीवपुर्क लक्ष दिले जात नाही या खड्ड्यात एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

या अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून त्वरीत. रास्ता दुरुस्ती करावी जिवीत हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार बांधकाम खाते राहील रस्ते दुरुस्ती न झाल्यास शिवसेना दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करेल याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे

निवेदनावर शरद भारंबे, शिवसेना शहर प्रमुख मिलींद पाटील ,माजी नगरसेवक धनंजय चौधरी, उपतालुका प्रमुख शामकांत पाटील, उपशहरप्रमुख गौरव भेरावा आदिंच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रतीं आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी , सहाय्यक पोलीस निरिक्षक (सावदा) पोलीस यांना देण्यात आल्या आहेत.

Protected Content