केसीईतर्फे कोरोना वॉरियर्सच्या कार्याला सलाम; कोरोना योध्दांचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय , केसीई शिक्षणशास्त्र व शा. शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि मु. जे.महाविद्यालयाचे जनसंवाद व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव शहरातील कोरोना वॉरियरच्या कार्याला सलाम करत कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला.

कोरानाचे संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता विविध वृत्तपत्र आरोग्य खाते, पोलीस खाते, डॉक्टर्स, कंपाउंडर, नर्स, महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार अशा विविध क्षेत्रातले कोरोना वॉरियर्स अहोरात्र आपली सेवा बजावत आहेत व आपल्या सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करीत आहेत अशा कोरोना वॉरियर्सच्या कार्याला एक सलाम व्हावा या उद्दिष्टाने या क्षेत्रातील प्रत्येक प्रतिनिधीचे सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

यांचा केला सत्कार
अ. भा.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुमित पाटील, लोकमतचे सागर दुबे, दै.बातमीदारचे निशांत पाटील, दैनिक केसरीराजचे भगवान सोनार, नरेश बागडे, देशोन्नतीचे योगेश सूने, लाईव्ह ट्रेन्ड न्यूजचे जितेंद्र कोतवाल तसेच फोटोग्राफर संदीप होले, देशदूतचे रवींद्र पाटील, भूषण हंसकर, तरुण भारतचे रामदास माळी, रोशन पवार, ए. म. न्यूजचे नितीन नांदुरकर, एशियन न्यूजचे सय्यद जुल्फिकार, दिव्य खान्देशचे अंकुश सुरवाडे , सुरेश कांबळे, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी सचिन भावसार, जयवंत पाटील, विश्राम अत्तरदे, राहुल पवार, महेंद्र जगताप, अमर आहेरराव, महेंद्र गायकवाड, अमित तडवी, सतीश बाविस्कर, कुणाल मराठे ,ज्ञानेश्वर चव्हाण, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश वारके, अल्ताफ मंसुरी, अमोल बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, नीलिमा पाटील, रघुनाथ सोनवणे, अतुल महाजन आदींचा संस्थेचे सन्माननीय सदस्य डी. टी. पाटील शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, केसीई चे जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख संदीप केदार, योगेश भालेराव यांनी मुख्याध्यापिका रेखा पाटील व डी. व्ही. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content