सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे आता दिसून येत आहे. यात आज एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सकाळी आढळून आले होते. ही महिला काही तासांनी उपचार सुरू असतांना मरण पावली. यामुळे कोरोना बाधीत चौथ्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सावदा येथे आजवर एकूण सहा कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून यातील चौघांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. तर मृत झालेल्या महिलेचे वास्तव्य असणारा परिसर सील करण्यात आला असून तिच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.