Home Cities अमळनेर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

0
47

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आठ रूग्ण पॉझिटीव्ह आले असून यामुळे आता रूग्णांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावचे पाच, अमळनेर चे दोन तर चाळीसगाव च्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound