सावदा शिवसेनेतर्फे नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 सावदा, प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना गलिच्छ व अपशब्द वापरल्या कारणाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज संध्याकाळी पोलीस ठाण्यात जाऊन देण्यात आले. 

 

शिवसेनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. इंगोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी, शहर प्रमुख सुरेश परदेशी, भरत नेते, शहर संघटक शरद भारंबे, निलेश खाचणे, माजी नगरसेवक शाम पाटील, गणेश माळी, मनीष बंगाळे, चेतन माळी, नाजिम आदी उपस्थित होते.

 

Protected Content