सावदा प्रतिनिधी । सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचे स्वॅबचे अहवाल काल उशीरा प्राप्त झाला असून एकाच कुटुंबातील चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा कोवीड सेंटरने संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी कोवीड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत स्वॅब आहवाल प्राप्त झाला असून यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान हा परिसर सिल करण्यात आला आहे. आढळून आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. या वृताला मुख्याधिकारी जोशी यांनी दुजोरा दिला आहे. सावदा शहरात आता एकुण ४९ कोरोनाबाधित झाले आहे. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू तर ३३ रूग्ण कोरोनामुक्त झालेत तर उर्वरित ८ रूग्ण उपचार घेत आहे.