महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, ठाकरे सरकार भ्रमित : चंद्रकांत पाटील यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनःश्च हरि ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार 2 किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार” असे म्हणत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?… अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमीपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत अनलॉकिंगचे नियम कायम ठेवताना, घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये, असे म्हटले आहे. त्यावरुन सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे.

Protected Content