Home आरोग्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

जळगांव जिल्हा प्रशासन च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव, यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती जय चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, नरेंद्र, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगांव, श्रीमती सरला पाटील गट शिक्षणाधिकारी, खलील शेख, गट शिक्षणाधिकारी, विनोद बियाणी, रेड क्रॉस, जय पाटील, समाधान बर्कले, पतंजली योग समिती, जळगांव, श्रीमती डॉ अनिता पाटील, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, प्रा डॉ नारायण खडके, शिव छत्रपती पुरस्कारर्थी, किशोर चौधरी, सुमेध तळवेलकर, शिव छ्त्रपती क्रीडा पुरस्कारार्थी आदी मान्यवर उपस्थीत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व मान्यवरांचे योगाचे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक श्रीमती स्मिता बुरकुल, श्रीमती श्वेता कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सादर केले. सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे आभार श्रीमती सुजाता गुल्हाणे, क्रीडा अधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिनल थोरात, किशोर चौधरी, भारत देशमुख, विनोद कुलकर्णी , उमेश मराठे, गोविंद सोनवणे, विनोद माने, संजय महिरे, सुरज पवार, अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound