सावदा येथे आ चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रतिबंधित क्षेत्रांत अंशत: सूट ।

 

सावदा, प्रतिनिधी ।  येथे गेल्या में महिन्याच्या मध्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने येथील गांधी चौक, संभाजी चौक सह इतर बराच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता.यातील काही भाग आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भागात जिल्हा बँक व सहकारी दूध डेअरी असून अंसख्य शेतकऱ्यांना येथेच काम असते. मात्र, गत एक ते दिड महिन्यापासुन हा भाग सील असल्याने शेतकऱ्यांनची अनेक महत्वपूर्ण कामे एन पेरणीच्या तोंडावर अडकली होती. त्यामुळे हा भाग लवकर मोकळा करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. मात्र प्रशासनाकडून याविषयी सकारत्मक हालचाली होताना दिसत नव्हत्या. अखेर आ चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत ही अडचण पोहचल्यावर त्यानी तात्काळ याविषयी अधिकारीवर्गाशी चर्चा करून यातून मार्ग काढल. शेवटी आज सोमवार दि. २२ जून रोजी याबाबत सकारत्मक निर्णय घेण्यात आला. जिल्हा बैंक व दूध डेअरी असणारा परिसरातील सील केलेला काही भाग मोकळा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची अनेक अडकलेली कामे मार्गी लागणार आहे, हा भाग मोकळा करतांना मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठान, सूरज परदेशी आदी उपस्थित होते.

Protected Content