कुंझर येथे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण उत्साहात

kuzar

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुंझर येथे श्रीराम मंदिरात पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत छञपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्यविकास अभियानाचे तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.

यामध्ये शासनाच्या विविध योजना शेतक-यांसाठी सुरु करण्यात आल्या. शेतक-यांनी गटशेतीकडे वळून कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी शासन शेतक-यांना मदत करणार आहे. यासाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण वर्ग, मेळावे, प्रदर्शन अश्या योजना राबवून शासनाच्या योजना या शेतक-यांना कश्या मिळतील यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियाननुसार रावेर सर्कलचे तीन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण गावातील श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

गटशेतीविषयक मार्गदर्शक
पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत राज्यशासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्यावतीने शासनाकडून प्रमाणित केलेल्या प्रशिक्षका पुजा देवतळे, सर्कल समन्वयक रणजित राजपुत यांनी शेतक-यांना तीन दिवस मोफत प्रशिक्षण संपूर्ण राज्यात सुरू आहेत. यात शासनाच्या या अभियाना अंतर्गत शेती, शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी शेतक-यांना एकत्रित येऊन गटशेती करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच महसूल मंडळ निहाय शेतक-यासाची आधी नोंदणी करत प्रशिक्षण संपन्न झाले. याचबरोबर पुढे या शेतक-यांचा होणारा जोड कार्यक्रम व वेळोवेळी होणा-या मिटिंग होईल. यात सहभागी झालेल्या शेतक-यांना सहभागा बद्दल प्रमाणपत्र व अन्य योजनांचा लाभ मिळेल.
आज या शेवटच्या दिवशी कार्यक्रमात महिलांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सहकार्य
कार्यक्रमासाठी चंद्रशेखर शिसोदे, दीपक कच्छवा, राकेश गुरव, भागवत बैरागी, प्रल्हाद सोनवणे, भगवान सोनवणे, राजेंद्र गोसावी, सुनील शिसोदे, दादा खांडेकर, गोपाल बैरागी, योगेश देवरे, पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले.

Protected Content