सावदा येथील नगरसेवक कोरोना बाधीत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरातील कोरोना संसर्ग वाढीस लागला असून आज एक नगरसेवक कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सावदा शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक दिवस कोरोनाचा संसर्ग नव्हता. तथापि, अलीकडच्या काळात शहरात अनेक पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहे. यात आता अजून एकाची भर पडली आहे. विशेष बाब म्हणजे संबंधीत व्यक्ती हे नगरपालिकेतील एक नगरसेवक असून त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या कोरोना पॉझिटीव्हमुळे शहरातील बाधीतांची संख्या अकरावर पोहचली असून यातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content