भुसावळात आढळला आई व मुलाचा मृतदेह

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील एका क्वॉर्टरमध्ये रेल्वे कर्मचारी व त्याच्या आईचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळून आले नाही.

शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील एका घरातून आज सकाळी दुर्गंधी आल्याने शेजारच्यांनी याची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी दार उघडून पाहिले असता यात फ्रान्सीस डॅनिअल आणि त्याच्या आईचे मृतदेह आढळून आले. हे मृतदेह कुजलेले असल्यामुळे दुर्गंधी येत होती. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळून आली नाही.

शहरातील बद्री प्लॉट परिसरात काही दिवसांपूर्वीच एका प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. यानंतर आज रेल्वे कर्मचारी व त्याच्या आईचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content