सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना लसीकरण

यावल,  प्रतिनिधी   ।  तालुक्यातील  सावखेडासीम प्राथमिक आोग्य केंद्रांतर्गत  येणाऱ्या उपकेंद्र दहिगाव, कोळवद, सातोद व मोहराळा येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण कोविशिल्ड लस उपलब्धतेनुसार करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना गावपातळीवरच कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, व नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी हे कार्यक्षेत्रातील उपकेंद्र दहिगाव, कोळवद, सातोद व मोहराळा या ठिकाणी लसीकरणाचे आयोजन करीत आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे तसेच आरोग्यसेवक भुषण पाटील, अरविंद जाधव, बालाजी कोरडे, व राजेंद्र बारी हे यशस्वीरित्या नियोजन करीत आहेत.  आज सावखेडासिम, दहिगाव, व कोळवद येथे ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दहिगाव येथे १७३, कोळवद येथे २४०, सातोद येथे १८०, व मोहराळा येथे ९० याप्रमाणे आजपर्यंत प्रागतिक लसीकरण  ४५ वर्षावरील नागरिकांना करण्यात आले. व यापुढेही लसीकरणाचे आयोजन करण्यात येईल. आरोग्य सेविका महेमुदा तडवी, अनिता नेहते, शबजान तडवी व प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते लस देण्यात आली. दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक शालीक चौधरी, व आशा सेविका यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content