महिला दिन विशेषः डॉ. योगिता पाटलांनी दिले जखमीला जीवनदान

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला रावेर येथील माऊली हॉस्पिटल येथे दाखल केले असून डॉ. योगिता पाटील यांनी तात्काळ उपचार करुन जखमीला जीवदान दिले. यानंतर डॉ. पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बाबत वृत्त असे की काल रात्री बुरहानपुर कडून डॉ योगिता पाटील व डॉ संदीप पाटील आपल्या खाजगी वाहनाने रावेरच्या दिशेने येत होते.तर बुर-हानपुर-अंकलेश्वर महामार्गावर गो-शाळे जवळ रात्री आठच्या सुमारास कोणत्या तरी ट्रकने कट मारल्याने तुळशिराम सुभाष सावळे (रा. कर्जोत) बेशुध्द पडले होते.मदतीसाठी कोणीही थांबत नसतांना डॉ योगिता पाटील देवदूत म्हणून तेथे पहोचल्या व रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या टोर्चमध्ये गाडीत असणाऱ्या इमर्जन्सी बॉक्स मधुन संबधित इसमावर उपचार केले. यामुळे तो शुद्धिवर आला येथे उपस्थित नागरीकांनी झालेला घटनाक्रम सांगितला डॉक्टर संदीप पाटील यांनी याची माहीती रावेर पोलिस स्टेशन सांगून जखमी इसमाला रावेर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपरार्थ पाठवाले जागतिक महिला दिनच्या पूर्वसंध्येला डॉ. योगिता पाटील यांनी अपघातग्रस्त इसमावर केलेल्या उपचारामुळे मिळालेल्या जिवनदानामुळे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 

Protected Content