धरणगाव,प्रतिनिधी । एक सामाजिक बांधिलकी असलेला तरुण.आई वडिलांकडूनच मिळालेली सामाजिक जाणीव महेंद्रला आज कामी येतेय आणि या कोरोना आणीबाणी काळात तो आपल्या मित्रांसह चिंतामणी मोरयावासियांच्या सुरक्षेसाठी धावपळ करतोय.
महेंद्र तायडे हा कोरोना योद्धा म्हणून चेक पोस्टवर ड्यूटी करत असतांना हेमंत माळी सरांच्या मार्फत त्याला संभाजी नगरात गुजरातहून आगंतुक आल्याचे समजले. लगेच त्याने चौकशी करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. चेककरुन घेतले आणि त्यांना तुम्ही होम काॅरन्टाईन असल्याचे सांगून बाहेर फिरायचं नाही, अशी सुचनाही केली. गेल्या पंधरवड्यात अशोक नगरमध्येही काॅरन्टाईन केलेली व्यक्ती असल्याचे लक्षात आल्यावर त्याने तातडीने प्रशासनाला माहिती दिली आणि परिसर निर्जंतुक करुन घेतला. काॅलनीच्या सीमा बंद करण्याकामी या तरुण मुलांचा मोठा वाटा आहे. अशी जागरूकता दाखवल्यामुळे मोरयावासी आज सुरक्षित आहोत. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनानिमित्त महेंद्र पूर्वी गौतम नगरमध्ये आणि आता मोरया मध्ये लहान मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत राहावी म्हणून संध्याकालीन फेरी काढतो,गेली कित्येक वर्षे त्याचा हा उपक्रम आजही सुरू आहे.