राज्य सरकारच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतर्फे कोरोना योद्धयांचा सत्कार

सावदा, प्रतिनिधी। मुख्यमंत्री साहेब मनोरुग्णांकडे करा दुर्लक्ष आता कोरोना एकच लक्ष असे म्हणत भारतीय जनता पार्टीच्या मेरा आंगण मेरा रणांगण आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून राज्य सरकार समर्थनार्थ कोरोना योद्ध्यांना सावदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरविण्यात आले.

काही लोकांकडून कोरोना योद्धयांचे खच्चीकरण करण्याच्या काम केले जात असून ही वेळ त्यांचा खच्चीकरण करण्याचं व राजकारण करण्याचे नसून सर्वांनी एकत्र येत कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाची लढण्याची आहे. म्हणून जर आपला जीव असला तर अंगण आणि रणांगण आपल्याला करता येईल. युद्धाच्या आधी जर खच्चीकरण करून आपले कोरोना योद्धा सैनिक थकवले तर आपण युद्ध कसे जिंकणार असा प्रश्न माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी उपस्थित करत महाराष्ट्र जिंकणार कोरोना हरणार असा विश्वास व्यक्त केला.

कोरोना योध्दे रावेर यावल तालुक्याचे प्रांत अधिकारी डाँ. अजित थोरबोले, रावेरच्या तहसीलदार अभिलाशा देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे, रावेर येथील गट विकास अधिकारी सोनिया नाकोडे, विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे सावदा येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी व समस्त कर्मचारी. सावदा येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी एन. डी. महाजन ,शामवेल बारेला, गणेश मराठे विशंभर नायर आरोग्य सेविका आरोग्य सेवक व रुग्णालयातील सर्व कर्मचारी. सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल वाघ व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व सावदा शहरातील सर्व पत्रकार व सावदा येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या श्रमीकांसाठी अन्नछत्र चालविणारे बाबुसेठ यांचा यांचा देखिल गौरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून सर्वांना एक किलो विटामिन सी असणारे मोसंबी व पुष्पगुच्छ देऊन सुमारे १२५ कोरोना योद्धयांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, सिमरन वानखे,डे कुशल जावळे, बंटी जंगले, चारू वानखेडे, हरी परदेशी, प्रदीप ठाकुर, गौरव वानखेडे, तेजस वंजारी, विजय तायडे,अजय भोई ,कोचुर येथील कमलाकर पाटील ,पत्रकार पंकज पाटील हे उपस्थित होते. यावेळी सामाजिक अंतर, तोंडाला मास्क, सॅनिटायझर नियमांचे पालन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्रीसाहेब मनो रुग्णांकडे करा दुर्लक्ष आता कोरोना एकच लक्ष, महाराष्ट्र जिंकणार कोरोना हरणार अशा आशियाचे बॅनर देखील सावदा शहर राष्ट्रवादी पार्टीतर्फे लावण्यात आली होती.

Protected Content