अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे स्पर्धा व मार्गदर्शन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर महिला मंच ट्रस्ट, यांच्यातर्फे नुकत्याच महिलांसाठी स्पर्धा व मार्गदर्शन यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी “पौष्टिक नाश्ता डिश” ह्य स्पर्धेत सहा जणींना बक्षिसं देण्यात आली. प्रथम क्रमांक -भक्ती मुंदडा, द्वितीय क्रमांक -सोनाली जैन यांना देण्यात आले. ह्या स्पर्धेचे सर्व बक्षिसे लिनेस क्लब यांचे तर्फे लिनेस अध्यक्षा शारदाताई अग्रवाल व सचिव कल्पनाताई मुंदडा यांनी दिली.

“वाढत्या वयातिल ढासळणारे सौन्दर्यास पुनरूज्जिवित करण्यासाठी खास ‘घरगुती उपाय’ या विषयावर नीता सोनार यांनी अतीशय सुंदर व सोपे घरगुती उपाय सांगुन मार्गदर्शन केले. नीताताई ह्या स्व:ता “मास्टर आँफ फाईन आर्टस” या विषयात गोल्ड मेडलिस्ट असुन एक ऊत्कृष्ट चित्रकार आहे. तसेच लिनेस क्लब तर्फे नीताताई यांचा व सर्व अमळनेर महिला मंचातील पदाधीकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. हे सर्व कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अपर्णाताई मुठ्ठे , कांचनताई शाह, सरोजताई भांडारकर व डॉ. मंजुश्री जैन आदींनी परीश्रम घेतले. कार्येक्रमास बहुसंख्येने महीला ऊपस्थीत होत्या.

Protected Content