यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या गावातून सागवान वृक्षांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत ७५ हजार रूपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वनविभागाचे कर्मचारी हे गस्तीवर असतांना इचखेडा ते किनगाव रस्त्याने दुचाकीवरून सागवान लाकूडची वाहतूक करतांना शनिवार २० ऑगस्ट रोजी आढळून आले. सागवान लाकूडची वाहतूक करण्याचा परवाना असल्याबाबत मागणी केली असता दुचाकीस्वार लाकूड सोडून पसार झाला आहे. पोलीसांनी ७५ हजार रूपये किंमतीचे सागवान लाकडाच्या पाट्या हस्तगत केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक यावल विभागाच्या पथकाने केली आहे. दरम्यान, सातपुडा पर्वतातील जंगलात सुरू असलेली वृक्ष तातडीने थांबविण्यात यावी अशी मागणी वृक्ष प्रेमींनी केली आहे.