साकळी येथे जि.प.शाळेत शिक्षण सभापतींच्या हस्ते शालेय पोषण आहाराचे वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील जि.प. शाळेत शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात शालेय पोषण आहारांतर्गत तांदूळ, दाळ व कडधान्ये समप्रमाणात जिल्हप परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी यावल कृऊबाचे माजी संचालक विलास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बोरसे, ग्रा.पं.सदस्य खतीब तडवी, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, शिक्षणप्रेमी सदस्य नितीन फन्नाटे, ईश्वर कोळी, उपाध्यक्ष सुलोचना माळी, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सपकाळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बापूराव महाराज, क्रांती परदेशी, सोनाली पवार, वनिता माळी, हर्षल बाविस्कर, संतोष जंजाळे, चंद्रकांत नेवे, विजय बाविस्कर, रंजना महाजन हे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ‘सोशल डिस्टस्टिंग’चे काटेकोरपणे पालन करत धान्याचे वाटप करण्यात आले. या वाटप प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content