सांगवी येथे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बैलाचा मृत्यू

चाळीसगाव, प्रतिनिधी तालुक्यातील सांगवी येथे सकाळी अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ४५ हजार रुपये किंमतीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, अर्जुन भोमा राठोड (रा. सांगवी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत.  ऊसतोडीचे कामे करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह तो करीत असतो. दरम्यान ऊसतोड मजूर असल्याने त्याच्याजवळ ९५,००० हजार रुपये किंमतीची बैलांची जोडी आहेत. ते नेहमीच घरासमोर बांधलेल्या असतात. मात्र, आज रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्कीट झाल्याने ४५  हजार रुपये किमतीचा एका बैलाचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अर्जुन भोमा राठोड यांचा संसार पूर्णपणे  उघड्यावर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाधव यांनी धाव घेऊन घटनेबाबत पोलिसांना कळवले आहे. दरम्यान हे शॉर्ट सर्किट कशामुळे झाले हे स्पष्ट झालेले नसून पंचनामा करणे सुरू होते. पंचनामा झाल्यानंतर महावितरण कंपनी या ऊसतोड मजुराचे नुकसान भरपाई देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

Protected Content