नवी दिल्ली वृत्तसंस्था-देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे.
देशातील बाधितांच्या संख्येन आता ४२ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील बाधितांची एकूण संख्या ४२ लाख ४ हजार ६१४ वर पोहचली आहे. जगात सर्वाधिक बाधितांच्या यादीत भारत दुसऱ्यास्थानी असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे.
देशातील बाधितांमध्ये ८ लाख ८२ हजार ५४२ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज देण्यात आलेले ३२ लाख ५० हजार ४२९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७१ हजार ६४२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.