फैजपूर शहरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; नागरीक संतप्त

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विद्यानगर भागात दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने डायरीया सदृश्य साथीच्या आजाराची काही लोकांना त्रास जाणवत असल्याने संतप्त नागरीकांनी आज नगरपालिकेवर धडक दिली.

यावेळी या नागरिकांनी दुर्गंधीयुक्त पाण्याची बादली मुख्याधिकारी यांच्यासमोर ठेवून आपला संताप व्यक्त केला. फैजपूर शहरात कोराना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून पालिकेकडून शहरात साफसफाई व फावणीवर भर दिला असतांना आज गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्यानगर भागातील महिला व नागरिकांनी पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या टेबलवर दुर्गंधी युक्त पाण्याची बादली ठेवून संताप व्यक्त केला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनाद्वारे विद्यानगर भागात नवीन पाईपलाईन टाकणे अशी मागणी केली आहे. दरम्यान यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आलेल्या नागरिकांची समस्या तात्काळ सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अमोल निंबाळे, नगरसेवक देवा साळी यांच्यासह प्रभाग ८ मधील महिला व नागरिक उपस्थित होते.

Protected Content