सर्वांची पुढची ४ वर्षे कोरोनासोबतच — डॉ . शशांक जोशी

 

 मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत प्रादुर्भाव कमी झाला असेल तरी राज्यातून कोरोनाची दुसरी लाट बाहेर पडायला २१ मे ते १५ जूनपर्यंतचा किमान कालावधी लागेल. ते सुद्धा आपण योग्यपद्धतीने वागलो तरच. कोरोना आपल्याबरोबरच तीन चार वर्ष राहणार आहे,” असं राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य  डॉ शाशांक जोशींनी म्हटलं आहे.

 

महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव  कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असं मत कोरोना टास्क फोर्सचे सदस्य  डॉ शाशांक जोशी यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील दुसरी लाट २१ मे ते १५ जूनदरम्यान ओसरेल  तिसरी लाट १०० टक्के येणार, यासंदर्भात कोणतंही दुमत नाहीय, मात्र जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केल्यास या लाटेत होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल असंही जोशी म्हणाले

 

महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील शक्यता व्यक्त करताना ही लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी असणार मात्र दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असणार महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे. मेच्या शेवटापर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला दुसरी लाट ओसरेल. त्यानंतर तिसरी लाट येईल असं सर्व डॉक्टर्स म्हणतायत.  आता लॉकडाउनला अनेकांचा विरोध आहे. कोरोनाची तिसरी नाही तर चौथी आणि पाचवी लाटही येणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. गथलाथनपणा केला, मास्किंग केलं नाही, सोशल डिस्टन्सिंग केलं नाही. परत अनेक ठिकाणी लोक गर्दी करु लागले तर सप्टेंबरपर्यंतच तिसरी लाट येणार. या लाटेत म्युटंट विषाणू असणार, अशी शक्यता जोशींनी व्यक्त केलीय.

 

“कुठल्याही विषाणूच्या लाटा येतातच. चार ते पाच लाटा येणार यात काही शंका नाही. अमेरिकेतील मिशिगनमध्ये सध्या चौथी लाट आलीय. फ्रान्समध्ये चौथी लाट आहे. लाट येणारच आहे पण त्याची दाहकता कशी कमी करता येईल याबद्दल चर्चा करता येईल,” असं जोशी म्हणाले. “पहिली लाट मागच्या वर्षी आली. दुसरी लाट झपाट्याने आली. यामध्ये स्ट्रेन नवा होता. प्रादुर्भाव वेगाने होत होता. रिकव्हरीही वेगाने होत होती. मृत्यूदर कमी होता. विदर्भात डबल म्युटंट विषाणूही आढळून आलाय. जिनॉमिक टेस्टींग आणि सर्विहलन्स वाढवायला हवा. तो आपण वाढवत नाही आहोत. फार कमी लेव्हलवर आपण हे करतोय. २५-२५ सॅम्पल आपण कलेक्ट करुन चाचण्या करतोय. कुठला स्ट्रेन आहे काय आहे मला ठाऊक नाही पण त्याचा सखोल अभ्यास केला जात नाहीय,” अशा शब्दांमध्ये जोशी यांनी विषाणूसंदर्भात अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली.

 

बंगालमध्ये ट्रीपल म्युटंट आहे. दिल्लीत युके स्ट्रेन आहे. तसाच म्युटंट विषाणू तिसऱ्या लाटेत असेल अशी भीती जोशींनी व्यक्त केलीय. मात्र आपण तिसरी लाट येण्याआधी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण केलं तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असंही जोशी म्हणाले आहेत.

 

“चौथी आणि पाचवी लाट येऊन गेली हे कळणार नाही लोकांना कारण आपण अनेकांचं लसीकरण केलेलं असणार. आपल्याला हर्ड इम्युनिटीसाठी ८० टक्के लोकांचं लसीकरण करावं लागणार. हे अशक्य आहे. त्यामुळेच जोपर्यंत आपण करोनासंदर्भातील शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण कोरोनावर मात करु शकणार नाही,” असं जोशी म्हणाले आहेत.

 

Protected Content