प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. यातील देशमुख आणि हजारिका यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळणार आहे.

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून करण्यात आली. यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा समावेश आहे. तर, नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच संगीतकार भूपेन हजारिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतासाठी घालवले.
२०१५ मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर आता प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे.

Add Comment

Protected Content