सर्पदंशामुळे शेतकऱ्याचा मृत्यु

 

  यावल  :  प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे शेतात काम करीत असतांना शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने जळगाव येथे उपचारादरम्यान  त्याचा दुदैवी मुत्यु झाल्याची घटना घडली आहे .

 

मुबारक दगडु तडवी ( वय३५ ,  रा- बोरखेडा खुर्द )  हे काल सायंकाळी बोरखेडा शिवारातील आपल्या शेतात हरभरा काढणीचे काम करीत असतांना पायास एका विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांना तात्काळ गावातील  लोक  व नातेवाईकांच्या मदतीने प्रथम यावल ग्रामीण रूग्णालयात  दाखल केले  नंतर  मुबारक तडवी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जळगाव येथे सामान्य रूग्णालयात  दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाला आहे . मुबारक तडवी यांच्या पश्चात पत्नी , दोन लहान मुली आणी वडील आहेत

Protected Content