सरकारी कंपन्यांचे १७२ पैकी ८६ संचालक भाजपशी संबंधित

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यातील  १७२ पैकी ८६ संचालक हे भाजपाशी संबंधित असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

 

केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये हे समोर आले आहे.  केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील १७२ स्वायत्त संस्थाच्या संचालकांपैकी ८६ हे भाजपाशी संलग्नित आहेत. १४६ केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमधील कंपन्यांची यावेळी पडताळणी करण्यात आली, यामधील ९८ कंपन्यांमध्ये १७२ स्वतंत्र संचालक आहेत. त्यात ८६ भाजपा नेते हे संचालक आहेत.

 

यामध्ये आता मार्केट्स रेग्युलेटर सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाना मंगळवारी स्वतंत्र संचालकांच्या व्यवस्थेत सुधारणा कशी करावी याविषयी चर्चा करणार आहे. त्यांची नियुक्ती आणि मंडळामध्ये त्यांची भूमिका याबाबत यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

 

दोन वर्षांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए) या केंद्र सरकारच्या थिंक टँकने हे स्पष्टपणे सांगितले होते की, “पीएसयूसाठी स्वतंत्र संचालकांची निवड स्वतंत्र राहिली नाही. अनुभवी डोमेन तज्ञांऐवजी माजी आय.ए.एस. किंवा अलीकडेच राजकीय लोकांना प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे आयडीची संपूर्ण कल्पनाच बिघडली आहे” असे त्यांनी म्हटले होते.

 

एक्सप्रेसने ब्लू चिप पीएसयूसह महारत्न (तीन वर्षांत २५,००० कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल) यांच्या  स्वतंत्र  संचालकांशी संवाद साधला. त्यासोबत अशा ८६ लोकांशी संपर्क साधण्याची प्रयत्न केला त्यापैकी ८१ संचालकांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मनीष कपूर हे भाजपाचे उप कोषाध्यक्ष आहेत. राजेश शर्मा हे भाजपाच्या सीए सेलचे माजी राष्ट्रीय संयोजक आहेत. राज कमल बिंदल हे १९९६ पासून भाजपासोबत आहेत. हे सर्व भारत हेवी इलेक्ट्रिक्सच्या स्वतंत्र संचालकांची यादीमध्ये सामील आहेत.

 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमच्या स्वतंत्र संचालकांमध्ये असणारे  राजेंद्र अरलेकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती आहेत. लता उसेंदी छत्तीसगढ भाजपा उपाध्यक्षा आहेत. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामधील एन शंकरप्पा कर्नाटक भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियममधील जी. राजेंद्रन पिल्लई हे केरळ भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य आहेत.

 

गेल (इंडिया) लिमिटेडमधील बंतो देवी कटारिया स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्या केंद्रीय मंत्री रतन लाल कटारिया यांच्या पत्नी आहेत. कटारिया हरियाणाच्या अंबाला येथील खासदार आहेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एआर महालक्ष्मी संचालक आहेत. त्या तमिळनाडू भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत. वरील सर्व नावे पाहता भाजपाच्या याच नेत्यांना स्वतंत्र संचालक पदे देण्यात आली आहेत जे निवडणूकांमध्ये पडले आहेत तरीही कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या जवळील आहेत.

 

Protected Content