जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | झारखंडमधील सम्मेद शिखरजी याला पर्यटन क्षेत्र म्हणून नव्हे तर पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात यावा अशी मागणी येथील सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून करण्यात आली.
झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी हे सकल जैन समाजाचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून वीस तीर्थंकर या ठिकाणी मोक्षाला गेले आहेत. जैन धर्मियांची ही पवित्र भूमी असून केंद्र शासनाने या पवित्र भूमीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून शासनाने या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ घोषित न करता तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे या मागणीसाठी जामनेर सकल जैन समाजाने आज तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा नेऊन निषेध नोंदविला व निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून सकल जैन समाज बांधव मोठ्या श्रद्धेने या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ही साधू संतांची भूमी आहे. वीस तीर्थंकर या भूमीत मोक्षाला गेले असून साधू संतांचे साधना व मोक्षाचे स्थळ आहे .अशा पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे निषेधार्थ असून शासनाने या भूमीस पर्यटन स्थळ नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी जामनेर दिगंबर जैन मंदिरापासून सकल जैन समाजा तर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जैन श्री संघाचे संघपती ईश्वर लाल कोठारी, पारसनाथ दिगंबर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मोहन जैन, जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष वीरेंद्र शाह, माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, शिक्षण संस्थेचे सचिव सुरेशचं धारिवाल, ईश्वर जैन पतसंस्थेचे चेअरमन कचरू शेठ बोहरा ,प्रकाशचंद जैन पतसंस्थेचे चेअरमन राजू कावडीया, सचिन चोपडा, संजू ललवाणी, राजू कोठारी, तेरापंथी संघाचे अध्यक्ष पवन सांखला, महेंद्र नवलखा, भरत सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी ,चातुर्मास समितीचे संघपती प्रशांत सैतवाल, विजय सैतवाल, एस. कुमार टेलर, बाळू सूर्यवंशी यांच्यासह समाज बांधव व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.